कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्यांचे वेतन करीता अनुदान व शिक्षक समायोजन बाबत 02 स्वतंत्र GR निर्गमित दि.28.05.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ 02 separate GR issued on 28.05.2025 regarding grant for salary of employees for the month of May and adjustment of teachers. ] : कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्यांचे वेतन करीता अनुदान तसेच विशेष शिक्षकांचे समायोजन बाबत राज्य शासनांकडून दिनाक 28 मे 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

01.वेतन अनुदान : शालेय शिक्षण विभागांकडून अनुदान वितरीत करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , उपलब्ध अनुदान हे नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर अनुदानातील राज्यातील नगरपालिका शाळा , जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शिक्षण , जिल्हा परिषदांना सहाय्य , प्राथमिक शिक्षण करीता सहाय्य , शिक्षकांचे प्रशिक्षण , शिक्षक प्रशिक्षण , अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , शिक्षकांच्या प्रशिक्षण करीता स्थानिक संस्थांना सहाय्य .

माध्यमिक शिक्षण संचालन व प्रशासन , माध्यमिक शिक्षण , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , पुर्वाध्ययन सैनिकी शाळांना सहायक अनुदान , माध्यमिक शिक्षण करीता इतर स्थानिक संस्थांना अनुदाने , प्रौढ शिक्षण , राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम , शालेय शिक्षण विभाग अशा विविध लेखाशिर्ष करीता अनुदानाचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

हे पण वाचा : महागाई भत्ता 2% वाढ शासन निर्णय निर्गमित दि.28.05.2025

02.महानगर पालिका अंतर्गत विशेष शिक्षकांचे समायोजन : महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करणेबाबत शासन शुद्धीपत्रक निर्गिमित करण्यात आले असून , सदर शुद्धीपत्रकानुसार सदर समायोजित उमेदवारांकडून तीन  जिल्ह्यांकरीता पसंतीक्रम घेण्याचे निर्देश आहेत .

समायोजनातुन नियुक्ती देताना सेवाज्येष्ठ असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश , तसेच प्राधान्य देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध संख्येपेक्षा जास्त पसंती आल्यास , यथास्थिती दुसरा व तिसरा प्राधान्यक्रम विचारात घेण्याचे निर्देश आहेत .

या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment