Khushi Pawar प्रतिनिधी [ 06 major important decisions were taken in the interest of employees in the cabinet meeting held today, May 27th. ] : आज दिनांक 27 मे 2025 रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत कर्मचारी हिताचे 06 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .
01.एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण व पदांना मंजुरी : पेण जिल्हा रायगड येथील सुहित जीवन ट्रस्ट अंतर्गत एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र तसेच सदर कार्यशाळेला आवश्यक असणाऱ्या पदांना मान्यता देण्यात आली आहे .
02.न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखक पदे मंजुर : राज्यातील न्यायिक अधिकारी करीता मा.शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार टंकलेखक हे पदे निर्माण करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे .
03.FDCM LTD. अंतर्गत सुधारित आकृतीबंधास मंजूरी : वन विकास महामंडळ , महाराष्ट्र राज्य अंतर्गत 1,351 पदांच्या सुधारित आकृतिबंधास सदर कॅबिनेट बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .
04.अंशकालिन निदेशकांच्या नियुक्तीस मंजूरी : उच्च प्राथमिक शाळांमध्ये ( स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ) अशंकालिन निदेशक पदांच्या नियुक्ती करीता सुधारित धोरणासाठी मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : पेन्शन धारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; जाणून घ्या सविस्तर .
05.कृषी पर्यवेक्षक / कृषी सहाय्यक पदनामात बदल : कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या पदनामामध्ये बदल करण्यात आला असून आता अनुक्रमे सहायक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी असा बदल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
06.वेतन आयोग थकबाकी : 6 वा वेतन आयोगाची थकबाकी राज्यातील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ , नागपुर अंतर्गत 195 कर्मचाऱ्यांना लाभ देण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली आहे .