Khushi Pawar प्रतिनिधी [ 2% DA increase along with salary/pension payment for May/April Government decision issued on 28.05.2025 ] : माहे मे पेड इन जुन वेतन देयकासोबत 02 टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 28 मे 2025 रोजी दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
डी.ए वाढ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील न्यायिक अधिकारी तसेच निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ लागु करण्यात आलेली आहे . सदर डी.ए वाढ ही दिनांक 01.01.2025 पासुन 02 टक्के म्हणजेच एकुण डी.ए 53 टक्के वरुन 55 टक्के इतकी वाढ करण्यात आलेली आहे .
डी.ए थकबाकी : सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , माहे जानेवारी ते एप्रिल महिन्यांची डी.ए थकबाकी रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यामुळे आता सदर अधिकाऱ्यांना मे महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 02 टक्के डी.ए वाढीसह 04 महिन्यांची डी.ए थकबाकीची रक्कम रोखीने मिळणार आहे .

इतर राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा निर्णय लवकरच : राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकारी / पेन्शन धारकानंतर आता न्यायिक अधिकाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
यानुसार पुढील महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील इतर सर्वच शासकीय / निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे .