Khushi Pawar प्रतिनिधी [ 4 important Government Decisions (GR) were issued on 19th May 2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 19 मे 2025 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत , सदर सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
01.गोपनिय अहवाल / कार्यमुल्यमापन अहवाल : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत कार्यरत गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकारी यांच्या सन 2024-25 या वर्षातील कार्यमुल्यमापन अहवाल / गोपनिय अहवाल लिहीणे संदर्भात सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .
02.तदर्थ पदोन्नती : ग्राम विकास विभाग मार्फत निर्गमित शासन निर्णयानुसार राज्य विकास सेवा मधील सहायक गट विकास अधिकारी ( एस – 15 ) गट ब संवर्गातील अधिकाऱ्यास गट विकास अधिकारी ( BDO ) गट अ ( एस – 20 ) मध्ये पदोन्नती देणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
03. 50/55 वर्षापलिकडे / सेवेचे 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर सेवा पुढे चालु ठेवणेबाबत : उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्गमित शासन निर्णयानुसार गट अ व ब ( राजपत्रित ) संवर्गातील ज्या अधिकाऱ्यांचे वय हे 50/55 वर्षापलिकडे अथवा सेवेचे 30 वर्षे पुर्ण झाले आहेत , अशांचे सेवा पुढे चालु ठेवणेबाबत मान्यता देण्यात आली आहे .
04.बदली / पदस्थापना : कृषी व पदुम विभाग मार्फत निर्गमित शासन निर्णयानुसार कृषी सेवा गट अ , उपसंचालक व गट ब तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी संवर्ग त्याचबरोबर प्रशासकीय सेवा गट अ व ब संवर्ग मधील अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापना करण्याकरीता समितीची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
वरील नमुद चारही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here