अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ या आठ प्रकरणीच ; वित्त विभाग शासन निर्णय ..

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी ( Arjit Leave GR ) : अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा मध्ये वाढ करणे तसेच कोणत्या प्रकरणी कर्मचाऱ्यांना रजा अनुज्ञेय होईल , असे प्रकरणे वित्त विभागाच्या दिनांक 15 जानेवारी 2001 रोजीच्या निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार , अर्जित रजा साठविण्याची मर्यादा ही 240 दिवसांवरुन 300 दिवस इतकी कमाल मर्यादा वाढविण्यात आली आहे . सदर मर्यादा वाढवत असताना , पुढे नमुद आठ प्रकरणीच अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्याचे प्रकरणे : यामधील पहिले प्रकरण म्हणजे कर्मचारी नियत सेवावधी नुसार सेवानिवृत्ती होत असेल , अशा प्रकरणी सदर रोखीकरणाचा लाभ अनुज्ञेय होईल .

02.सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा ही लोकहिताच्या दृष्टीने त्याच्या नियत सेवावधी सेवानिवृत्तीच्या दिनांकापुढे वाढविण्यात आली असेल , अशा प्रकरणी सदर रजा रोखीकरण लागु करण्यात येते .

03.स्वेच्छा तसेच मुदतपुर्व निवृत्ती प्रकरणी अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ अनुज्ञेय केला जातो .

04.ज्या कर्मचाऱ्याची सेवा ही नोटीस देवून त्या बदल्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांस वेतन व भत्ते अदा करुन किंवा नियुक्तीच्या अटी / शर्तीप्रमाणे अन्य प्रकारे समाप्त केली असेल , अशा प्रकरणी सदर अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय केले जाते .

05.कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या पुनर्नियुक्तीच्या समाप्तीनंतर (नियम 65 नुसार ) अर्जित रजेचे रोखीकरण दिले जाते .

06.कर्मचाऱ्याचे सेवेत असताना , मृत्यु झाले असेल अथवा त्याच्या कुटुंबाला देतेवेळी अशा प्रकरणी नियम 69 नुसार अर्जित रजेचे रोखीकरण दिले जाते .

07.कर्मचाऱ्याचे निवृत्तीपुर्व रेजेच्या प्रकरणी नियम 66 ( 1 ) नुसार अर्जित रजेचे रोखीकरण दिले जाते .

08.सरकारी कर्मचाऱ्याचे सार्वजनिक उपक्रम मध्ये समावेशन झाल्याच्या प्रकरणी अर्जित रजेचे रोखीकरण वित्त विभागाच्या दिनांक 28.04.1981 रोजीच्या निर्णयानुसार लाभ अनुज्ञेय करण्यात येते .

Leave a Comment