आठवा वेतन आयोगामध्ये पे – लेव्हल 1 – 10 पर्यंतचे संभाव्य सुधारित वेतनस्तर ; जाणून घ्या आत्ताची संपुर्ण वेतन अहवाल !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Possible revised pay scales for pay levels 1 – 10 in the Eighth Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापासुन दिनांक 01.01.2026 नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) लागु केला जाणार आहे . सदर वेतन आयोगांमध्ये पे-लेव्हल 1-10 पर्यंतचे संभाव्य सुधारित वेतनस्तर कसे असतील याबाबतचा संपुर्ण वेतन अहवाल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

आठवा वेतन आयोगांध्ये प्रमुख बदल : आठवा वेतन आयोगांध्ये कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी इन हॅन्ड वेतन वाढविण्यात येणार आहेत , म्हणजेच कपाती कमी प्रमाणात होणार आहेत . कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार आर्थिक स्वरुपात पारितोषिकाची तरतुदी करण्यात येणार आहेत .

नविन वेतन आयोग समिती : सध्य स्थितीत आठवा वेतन आयोगाची स्थापना करुन त्यामध्ये उप-समितीची स्थापना करण्यात आली आहे , याशिवाय सल्लामसलत समितीकडून कर्मचारी संघटना व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे . तसेच मसुदा व कायदेविषयक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगातील तफावत संदर्भात महत्वपूर्ण अहवाल ; वाचा सविस्तर !

सुधारित संभाव्य वेतनस्तर : कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार किमान फिटमेंट फॅक्टर 2.00 पट तर कमाल 2.50 पट फिटमेंट फॅक्टर नुसार सुधारित वेतनस्तर निश्चित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . यांमध्ये 2.50 पट फिटमेंट फॅक्टरनुसार प्रस्तावित किमान मुळ वेतनाचा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .

पे-लेव्हलसध्याचे किमान मुळ वेतन (7 वा वेतन आयोगानुसार)संभाव्य किमान मुळ वेतन ( 8 वा वेतन आयोगानुसार)
पे लेव्हल -0118,00025,000
पे लेव्हल -0219,90027,000
पे लेव्हल -0321,70030,000
पे लेव्हल -0425,50035,000
पे लेव्हल -0529,20040,000
पे लेव्हल -0635,40050,000
पे लेव्हल -0744,90060,000
पे लेव्हल -0847,60065,000
पे लेव्हल -0953,10070,000
पे लेव्हल -1056,10075,000

वरील तक्ता नुसार आठवा वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 2.5 पट नुसार  संभाव्य किमान मुळ वेतन असतील .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment