30 वर्षे सेवा होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना NPS / सुधारित NPS किंवा केंद्राची UPS पेन्शन योजनापैकी जास्त पेन्शन कोणत्या योजनेत मिळेल !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Employees who have served for 30 years will get higher pension under which scheme, NPS/Revised NPS or the Centre’s UPS Pension Scheme? ] : राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे .

NPS योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना कमी पेन्शन का मिळत गेली ? : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिनांक 01.11.2005 नंतर राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली , त्यावेळी कर्मचारी योगदान सुरु होते , त्यानंतर सरकारने सरकारचे योगदान वाढवले , दिनांक 01.04.2019 पासुन महाराष्ट्र राज्य सरकारने NPS मधील ..

सरकारचे योगदान 10 टक्के वरुन 14 टक्के इतके करण्यात आले . यामुळे NPS मधील राज्य कर्मचाऱ्यांची जमा वाढ होण्यास मदत झाली . सरकारचे योगदान किंवा सुरुवातील सरकारचे योगदान नसल्याने , सन 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना NPS योजनेमध्ये कमी पेन्शन मिळत गेली .

युपीएस पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 वर्षे पुर्ण झाल्यानंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल , तर किमान 10,000/- रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे .

परंतु ज्यांची सेवा ही 30 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक राहील त्यांच्यासाठी UPS / सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना खरी परवडेल का ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे . हे गणित आपण एका पुढील उदा. च्या माध्यमातुन जाणून घेवूयात ..

समजा सातवा वेतन आयोगामध्ये एक कर्मचारी लिपिक पदावर सेवेत रुजु झाला , त्याची सेवा ही 30 वर्षे आहे . तर त्यास दहा , वीस वर्षानंतर ( पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना धरुन ) शेवटचे मुळ वेतन हे 68600/- रुपये इतके येईल . तर त्याचे NPS मधील कर्मचारी योगदान व सरकारचे योगदान मिळून साधारणपणे ( वार्ष‍िक वाढ 10 टक्के व 10 टक्के NPS मधील व्याज / लाभांश ) धरुन एकुण रक्कम 1 कोटी 18 लाख रुपये इतकी जमा होईल .

हे पण वाचा : पदोन्नती , आश्वासित प्रगती योजना , निवृत्तीविषयक लाभ प्रकरणे मार्गी लावणेबाबत विशेष मोहिम ; GR निर्गमित ..

यापैकी कर्मचाऱ्यास 60 टक्के रक्कम निवृत्तीनंतर 71 लाख रुपये मिळते , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस निवृत्तीनंतर आधार मिळेल , तर उर्वरित 40 टक्के रक्कम 47 लाख रुपये वर पेन्शन मिळेल . साधारणपणे 7 टक्के वार्षिक व्याज प्रमाणे धरल्यास , मासिक 27500/- रुपये ( साधारणपणे ) पेन्शन मिळेल .

तर हेच गणित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजनामध्ये शेवटचे मुळ वेतन 68600/- च्या 50 टक्के म्हणजेच 34,300/- रुपये मिळेल , यांमध्ये कर्मचाऱ्यांचे जमा असणारी कोणतीही रक्कम मिळणार नाही .

यामुळे ज्यांची सेवा ही 30 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल , अशा कर्मचाऱ्यांनी पेन्शन पर्याय निवडताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असेल , राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये जोखिम आहे हे निश्चित आहे . कारण सदर रक्कम ही शेअर बाजारवर आधारित असते .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment