Khushi Pawar प्रतिनिधी [ Khullar Committee gives justice to only 105 posts; Demands for revised pay scale of remaining 337 posts rejected ] : वेतनत्रुटी निवारण समितीकडून केवळ विविध विभागातील केवळ 105 पदानांच न्याय दिला आहे , उर्वरित विविध विभागातील 337 पदांच्या सुधारित वेतनश्रेणीच्या मागण्या अमान्य करण्यात आलेल्या आहेत . त्यामागचे नेमके कारणे काय आहेत ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आश्वासित प्रगती योजना : काही विभागातील संवर्गांना आश्वासित प्रगती योजना अंतर्गत पदोन्नती पदाची वेतनश्रेणी मिळण्याची मागणी करण्यात आलेली होती , सदर बाब वित्त विभागाच्या दिनांक 02.03.2019 रोजीच्या कायद्याच्या विसंगत बाब होती .
लिपिक वर्गीय संवर्ग : काही विभागातील लिपिक वर्गीय संवर्गांनी वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी मिळण्याची मागणी केली होती , परंतु लिपिक पदांना कनिष्ठ लिपिक – वरिष्ठ लिपिक – मुख्य / प्रमुख लिपिक व सहाय्यक अधिक्षक / अधिक्षक अशी पदोन्नतीची साखळी उपलब्ध असल्याने सदर संवर्गांना वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी कनिष्ठ पदांस देणे अयोग्य असल्याचे समितीने स्पष्ट केले .
मागण्यांच्या समर्थनार्थ प्रस्ताव नसणे : सदर समिती ही न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या याचिका संदर्भात राज्य शासनांकडून गठीत करण्यात आलेली होती , यांमध्ये सदर समितीने ज्या कर्मचाऱ्यांने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती , अशा कर्मचाऱ्यांस / किंवा सदर कर्मचारी समुहास पाचारण केले नव्हते .
तर सदर पदाच्या संबंधित असणारी संघटनास अभिप्राय देण्यासाठी पाचारण केले होते ,अशा बऱ्याच संघटनांकडून समर्थनार्थ अभिप्राय न दिल्याने विविध विभागातील तब्बल 337 पदांच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत .
हे पण वाचा : अमान्य करण्यात आलेल्या , सुधारित वेतनश्रेणीचा पुनश्य विचार ..
समान पदे असूनही समान वेतन नाही : राज्यातील विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे समान पदे / समान काम असून मागील वेतन आयोतील वेतनत्रुटीमुळे सदर खुल्लर समितीने सदर पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु केली नाही .
समितीचा उद्देश : सदर समिती ही सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दुर करणे हा होता , परंतु सदर समितीने केवळ संघटनांकडून करण्यात आलेल्या मागणींचा विचार करुन अहवाल तयार केला असल्याचे निदर्शनास आले आहे . यात मा.न्यायालयांमध्ये दाखल याचिकेतील मागणीचा विचार करण्यात आला नाही .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..