कर्मचारी वेतन अनुदान अदा करणे व सेवा समाप्ती बाबत 02 स्वतंत्र GR निर्गमित दि.23.05.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ 02 separate GR issued on 23.05.2025 regarding payment of employee salary subsidy and termination of service  ] : कर्मचारी वेतन अदा करणे व सेवा समाप्ती बाबत दिनांक 23 मे 2025 रोजी राज्य शासनांकडून दो न स्वतंत्र महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.कर्मचारी वेतन : अंगणवाडी सेवा ( अतरिक्त राज्य हिस्सा ) , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 नुसार जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100 टक्के 36 सहायक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्ष करीता ..

सन 2025-26 करीता अर्थसंल्पित करण्यात आलेल्या 327 कोटी रुपयांपैकी 49 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे . यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी / कर्मचारी यांचे माहे मे 2025 चे वेतन विहीत मुदती अदा केले जाणार आहेत .

02.सेवा समाप्ती : सतत अनधिकृत गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत . यांमध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ ( एस – 20 ) या संवर्गात नियुक्त करण्यात आलेल्या तसेच परिविक्षाधिन काळामध्ये नैमित्तिक रजा वगळून इतर प्रकारच्या ..

हे पण वाचा : कर्मचारी बदली धोरण मध्ये सुधारणा , सुधारित GR निर्गमित दि.23.05.2025

रजा मंजूर करताना त्याचा परिविक्षा काळाची रजेच्या कालावधी इतका किंवा 01 वर्ष पर्यंत वाढविता येते . तर परिविक्षाधीन काळांमध्ये कर्मचारी / अधिकारी हा 07 दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहील्यास सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची तरतुद आहे .

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये बरेच आरोग्य अधिकारी परिविक्षा काळामध्येच 01 वर्षे पेक्षा अधिक काळाकरीता अनधिकृतपणे गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आल्याने सदर 58 अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सदर शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत .

या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here (GR)

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment