Khushi pawar प्रतिनिधी [ mahagai Bhatta vadh shasan nirnay gr ] : आज दिनांक 28 मे 2025 रोजी विधी व न्याय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकाच्या धर्तीवर 02 टक्के डी.ए वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकारच्या वित्त व व्यय विभाग नवी दिल्ली यांच्या पत्र क्र.01/1(1)/2025 दिनांक 02 एप्रिल 2025 रोजीच्या प्रत नुसार महाराष्ट्र राज्यांमधील विधी व न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी संदर्भातील माहिती अग्रेषित करण्यात आलेली आहे .
महागाई भत्ता मध्ये 2 टक्के वाढ : सदर शासन निर्णयानुसार दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर नमुद अधिकारी तसेच पेन्शन धारकांना 02 टक्के म्हणजेच एकुण डी.ए 53 टक्के वरुन 55 टक्के करणेबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे .
थकबाकी रक्कम अदा करण्याचे निर्देश : सदर शासन निर्णयानुसार दिनांक 01.01.2025 पासुन महागाई भत्ताची थकबाकी अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
हे पण वाचा : DA वाढ शासन निर्णय डाउनलोड करा..
कोणत्या अधिकाऱ्यांना डी.ए वाढ : या पुर्वीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार आखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शन धारकांना डी.ए वाढ लागु करण्यात आले होती , सदर निर्णयानुसार राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच न्यायिक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्यात आली आहे .
या संदर्भातील DA वाढ शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी Click Here