खुशी पवार प्रतिनिधी [ A very important decision has been made for teachers. ] : शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 16 जुन 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार बदली धोरण विशेष संवर्ग भाग – 01 बाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली करीता सुधारित धोरण दि.18.06.2024 रोजीच्या निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत . सदर निर्णयातील व्याख्या 1.8 मध्ये विशेष संवर्ग भाग – 01 म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक , दिव्यांग शिक्षक , 53 वर्षे पुर्ण झालेले शिक्षक ..
दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक , विधवा , कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमुद गंभीर आजाराने ग्रस्त ग्रस्त आहेत इ. अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे .
तसेच विशेष संवर्ग – 01 मधून विविध आजारांची तसेच दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करुन बदलीमधून सुट मिळविणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत . तसेच काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करुन अशा शिक्षकांना बदली मधून का वगळण्यात आले आहेत , याबाबत खुलासा सादर करणे बाबत शासनास आदेशित करण्यात आले आहेत .
यामुळे शिक्षक भाग – 01 च्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सदर बाब निदर्शनास आणून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
विशेष संवर्ग भाग – 01 मधून बदलीपासुन वगळण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर प्रमाणपत्र चुकीचे असल्यास , अशा शिक्षकांच्या विरुद्ध कारवाई न केल्याचे आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .
