अधिकारी / कर्मचाचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.16.07.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Important GR regarding office attendance flexibility concession of officers/employees issued on 16.07.2025 ] : अधिकारी / कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत सा.प्र.विभाग मार्फत दि.16.07.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र शासनांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी 05 दिवसांचा आठवडा करण्यात आलेला आहे . यामुळे सरकारी कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आलेली आहे . यानुसार कार्यालयीन वेळ ही 9.45 वा . ते सायंकाळी 06.15 अशी करण्यात आलेली आहे .

सामान्‍य प्रशासन विभागाच्या दिनांक 31.12.2014 रोजीच्या संकीर्ण द्वारे दिनांक 01 जानेवारी 2015 पासुन मंत्रालय मधील अधिकारी यांना कार्यालयात उपस्थिती नोंदविण्यासाठी 60 मिनिटांची लवचिकता सवलत दिलेली आहे .

यानुसार सदर अधिकारी / कर्मचारी सकाळी 9.45 ते 10.45 या वेळात जेवढे उशिरा कार्यालयांमध्ये येतील , तितका वेळा सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना सायंकाळी 6.15 नंतर उशिरा थांबून काम करावे लागणार आहे .

यामुळे उशिरा येणाऱ्यांना यापुढे कार्यालयात उशिरा थांबावे लागणार आहेत , सदर सुविधा केवळ मंत्रालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी लागु आहे .

Leave a Comment