राज्य कर्मचाऱ्‍यांच्या बाबतीत आत्ताची काही महत्वपुर्ण ताज्या बातम्या ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Some important latest news regarding state employees ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताच्या काही चालु / महत्वपुर्ण घडामोडी या लेखांमध्ये जाणून घेवूयात .

01.स्वातंत्र्य दिनानिमित्त 50 स्वच्छता कर्मचारी प्रमुख पाहुणे : यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली महानगरपालिका मधील 50 स्वच्छता कर्मचारी हे विशेष पाहुणे असणार आहेत .

02.बेस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन : बेस्टमधुन  निवृत्त झालेले तब्बल 4500 कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटी मिळत नसल्याने , बेस्ट उपक्रमाच्या या जाचक निर्णयाच्या विरोधात आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे .

03.रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन : आदिवासी विकास विभाग अंतर्गत मागील वर्षी रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणारे तब्बल 4500+ रोजंदारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे आदेश दिल्याने , काल दिनांक 09 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधुन सदर कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरु आहे .

04.दिवाळीपुर्वी डी.ए वाढीची शक्यता : माहे जुलै 2025 ची डी.ए वाढ दिवाळी पुर्वी लागु केली जाण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवितण्यात येत आहे . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने डी.ए लाभ मिळत असून , पुन्हा जुलै 2025 पासुन 3 टक्के वाढीची शक्यता असून एकुण डी.ए दर हे 58 टक्के इतका होईल .

05.निवृत्तीचे वय : राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , बऱ्याच दिवसांपासुन होणाऱ्या मागणीला तुर्तास राज्य सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला नसल्याने , सदर मागणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे .

06.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन : ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत कार्यरत शिपाई पदांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन , पेन्शन लाभ , निवृत्ती नंतरची इतर लाभ अनुज्ञेय करण्याच्या मागणीसाठी जिल्हा निहाय आंदोलन सुरु आहेत .

Leave a Comment