Khushi Pawar प्रतिनिधी ( Arjit Raja Rokhikaran ) : राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अर्जित रजेचे रोखीकरण दिले जाते , या रोखीकरणाची गणना कशी केली जाते ? लाभ कोणत्या पदास मिळतो ? या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेवूयात ..
अर्जित रजेचे रोखीकरण : ज्या अर्जित रजेचा उपभोग घेतला नाही , अशा अर्जित रजेचे रोखीकरण रोख स्वरुपात 300 दिवसांच्या मर्यादेत लाभ निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस दिले जाते .
कोणत्या कर्मचाऱ्यास लाभ दिला जातो ? : ज्या पदांना दिवाळी / उन्हाळी सुट्टी किंवा दीर्घ सुट्टीचा लाभ मिळतो , अशा पदांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळत नाही . अर्जित रजा ह्या वर्षाला 30 दिवस इतक्या जमा होतात . तर ज्या पदांना उन्हाळी सुट्टी / दिवाळी सुट्टी लागु आहेत , अशा पदांना वर्षाला 10 दिवस अर्जित रजा त्यांच्या खाती जमा होतात .
अर्जित रजा रोखीकरण काढण्यासाठी सुत्र : = (शेवटचे मुळ वेतन + चालु महागाई भत्ता ) X शिल्लक अर्जित रजा / 30 |
हे पण वाचा : अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ या आठ प्रकरणीच ; वित्त विभाग शासन निर्णय .
उदा : शेवटचा मुळ वेतन = 51000 , चालु महागाई भत्ता = 53 , शिल्लक अर्जित रजा 300 = ( 51000 + 27030 ) X 300 / 30 = 78030 X 10 =780,300 /- रुपये इतकी अर्जित रजेचे रोखीकरण सदर कर्मचाऱ्यास मिळेल . |
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..