राज्य कर्मचाऱ्यांना 2% डी.ए वाढीची तारीख झाली निश्चित ; जाणून घ्या महत्वपुर्ण अपडेट !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Date of 2% DA hike for state employees has been fixed; know important update.. ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना 02 टक्के डी.ए वाढीबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .

अधिकृत्त GR : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा अधिकृत्त GR होण्याची प्रतिक्षा कर्मचारी करीत आहेत .

राज्याचे अधिवेशन हे दिनांक 18 जुलै पर्यंत असणार आहे , सदर अधिवेशनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीकरीता आर्थिक तरतुद करण्यात आली असल्यास , याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय या महिन्यांत निर्गमित केला जाईल .

प्राप्त माहितीनुसार या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डी.ए वाढीचा अधिकृत्त GR निर्गमित केला जाईल , व या महिन्यांच्या ( जुलै ) वेतन तर पेन्शन धारकांना पेन्शन देयकासोबत वाढीव 02 टक्के डी.ए देण्यात येईल .

फरकाची रक्कम : सदर डी.ए वाढ ही दिनांक 01.01.2025 पासुन लागु असल्याने , डी.ए फरकाची रक्कम देखिल अदा करण्यात येईल . राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूरी मिळाल्यास , वित्त विभागांकडून त्वरीत अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित केला जाईल .

डी.ए वाढ वित्त विभागाकडून निर्गमित GR प्रमाणे : यापुर्वी राज्य शासनांकडून आखिल भारतीय सेवेतील व न्यायालयीन विभागातील अधिकारी व निवृत्त पेन्शन धारकांना दिनांक.01.01.2025 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर दि.15.05.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसारच डी.ए वाढ व डी.ए फरक लागु करण्यात येणार आहे .

Leave a Comment