@khushi Pawar प्रतिनिधी – मुंबई न्युज : देशातील सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांची हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने आधार बेस्ट प्रणाली द्वारे होत आहे . याकरिता केंद्र सरकारकडून बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम ( BAS) तयार करण्यात आले आहे .
सदर सिस्टिमच्या माध्यमातून देशातील तब्बल 729 सरकारी , निमसरकारी यंत्रणांची ऑनलाइन आधार बेस सिस्टीमच्या माध्यमातून हजेरी होत आहेत . आतापर्यंत सदर सिस्टीमवर तब्बल 331,898 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे . सदर सिस्टीमवर कर्मचाऱ्यांकडून दिनांक 27 मार्च 2025 पासून ऑनलाईन हजेरी नोंदविण्यात येत आहे .
सदर हजेरी ही ऑनलाईन आधार बेस ( Face Authentication ) पद्धतीने असल्याने , ज्या कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड अपडेट आहेत , अशाच कर्मचाऱ्यांना या सिस्टीमच्या माध्यमातून हजेरी नोंदवता येणार आहे . तर ज्यांचे अद्याप पर्यंत नोंदणी झाली नाही , अशा कर्मचाऱ्यांचे नोंदणी न झाल्याचे कारणे संबंधित विभागाकडून विचारले जात आहेत .
सदर बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम मध्ये एकूण रजिस्टर ऑर्गनायझेशन , नोंदणी झालेले कर्मचारी , सद्यस्थितीत हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या असा तपशील सदर सिस्टीम वर सर्वांना पाहता येणार आहे .
सदर सिस्टिम हाताळण्यासाठी अत्यंत सोपी असून , सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा तपशील ऑनलाईन पद्धतीने आधार बेस प्रणाली द्वारे सदर सिस्टीम वर रेकॉर्ड केला जाणार आहे . ही सिस्टीम कर्मचारी व सरकार यांच्यासाठी उपयुक्त असणार आहे .
सदर सिस्टीम वर नोंदणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आधार फेस Authentication साठी (हजेरी लावण्यासाठी ) प्ले स्टोर वरून AadhaarFACERD हे ॲप्स डाऊनलोड करून , त्या माध्यमातून ऑनलाईन हजेरी नोंदवावी लागणार आहे .