सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  सरकारकडून नवीन धोरण जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Khushi pawar प्रतिनिधी [Government announces new policy for government employees  ] : सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन करिता यापुढे डिजिटल कोर्स  ( Digital Course ) करावा लागणार आहे . या संदर्भात देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश जाहीर केले आहेत .

प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे प्रमोशन (पदोन्नती  ) करिता IGOT कर्मयोगी या पोर्टलवर डिजिटल माध्यमातून कोर्स पूर्ण करावी लागणार आहे . हा कोर्स सर्व कर्मचाऱ्यांना अनिवार्य केलेला आहे .

ज्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनावर परिणाम दर्शविणार आहे . यामध्ये दिनांक 01 ऑगस्टपर्यंत अभ्यासक्रम अपलोड केले जाणार असून , दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत यासंदर्भात मूल्यांकन प्रक्रिया केली जाणार आहे , अशी बाब नमूद करण्यात आली आहे .

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी प्रतिवर्षी सहा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहेत . यामध्ये नऊ वर्ष 16 वर्ष त्याचबरोबर 16 वर्षापेक्षा अधिक व 25 वर्षापर्यंतच्या आणि 25 वर्षे पेक्षा अधिक अशा वर्गवारीनुसार कर्मचाऱ्यांचे अभ्यासक्रम ठरवले जाणार आहेत .

हे पण वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” आहेत , प्रमुख 03 प्रलंबित मागण्या ; अधिवेशनात निर्णयाची अपेक्षा !

कर्मचाऱ्यांना नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या 50% अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहेत . यापूर्वी सदर अभ्यासक्रम सुरू होते परंतु अनिवार्यता नव्हती ,  परंतु माहे जुलै 2025 पासून सदर अभ्यासक्रम प्रमोशन करिता त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करिता ग्राह धरले जाणार आहेत .

कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन प्रमोशन इत्यादी बाबी करिता सदर अभ्यासक्रम ग्राह्य धरून पुढील कार्यवाही केली जाईल , सदर कोर्स पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची मूल्यांकन केले जाणार नसल्याची बाब नमूद आहे .

Leave a Comment