Khushi Pawar प्रतिनिधी : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या लागु करण्यात येणारा आठवा वेतन आयोग बाबत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडी समोर आल्या आहेत , याबाबतच्या सविस्तर घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
किमान फिटमेंट फॅक्टर : केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आलेले आहेत , ज्यामध्ये किमान 2 पट फिटमेंट देणेबाबत मागणी करण्यात आलेली आहे . सातवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2.57 पट प्रमाणे वेतनात वाढ देण्यात आलेली होती .
किमान फिटमेंट फॅक्टर व किमान वेतनातील वाढ : किमान फिटमेंट फॅक्टर मध्ये 02 पट वाढ लागु केल्यास , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये 5,000/- रुपयांची वाढ होईल . म्हणजेच किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये वरुन वाढून 23,000/- इतकी वाढ होईल .
महागाई भत्ता मध्ये स्वयंचलित पद्धतीने वाढ : महागाई भत्ता वाढ ही केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना वर्षातुन 02 वेळा वाढीव लाभ दिला जातो . परंतु याबाबत सरकारकडून तात्काळ निर्णय घेतला जात नसल्याने , कर्मचारी / पेन्शनधारकांना वाढीव डी.ए करीता बराच कालावधीची वाट पहावी लागते .
यामुळे आठवा वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता वाढीकरीता कोणत्याही निर्णय / अधिसूचनाची आवश्यक न भासता , ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित डी.ए वाढीचा लाभ स्वयंचलित पद्धतीने लागु करण्याची मागणी करण्यात आलेली .
वाहन भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालय तसेच इतर कार्यालयीन भेटी करीता भेट द्यावी लागते , त्याकरीता आवश्यक वाहन भत्ता सातवा वेतन आयोगांमध्ये तरतुद नाही , तर याकरीता आठवा वेतन आयोगांमध्ये विशेष तरतुद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
बाजार किंमतीनुसार देय भत्तातील वाढ : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता , मुलांच्या शिक्षणांसाठी विशिष्ट मर्यादेत शिक्षण भत्ता , घरभाडे भत्ता , तसेच घरभाडे भत्ता देय करण्यात येते . सदरचे भत्ते हे कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनावर आधारित असते . परंतु हे भत्ते हे मुळ वेतनावर आधारित न करता बाजार किंमतीवर अवलंबून असावेत , अशी मागणी करण्यात आलेली आहे .
जसे कि , ज्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन हे 18,000/- रुपये आहे , त्यास सध्याच्या घरभाडे भत्ता नुसार वास्तव्याच्या ठिकाणानुसार 1800/- ( 10 टक्के ) , 3600/- ( 20 टक्के ) , 5400/- ( 30 टक्के ) असे घरभाडे भत्ता दिला जातो . तर एखाद्या अधिकाऱ्यास , त्याचे मुळ वेतन 80,000/- रुपये इतके असल्यास त्यास ( 10 / 20 व 30 टक्के ) नुसार 8000/- रुपये , 16,000/- रुपये व 24,000/- रुपये इतके घरभाडे भत्ता मिळतो .
परंतु सदर घरभाडे भत्ता अदा करण्याची संरचना व प्रत्यक्ष बाजार किंमती मध्ये खुप मोठा फरक आहे . यामुळे सदर भत्ता अदा करताना प्रत्यक्ष व्यावहारिक बाजारी किंमती नुसार घरभाडे देण्यात यावा अशी बाब नमुद करण्यात आलेले आहेत .
वाहन भत्ता : तसेच वाहन भत्ता अदा करताना देखिल सध्याचे इंधनाच्या किंमती लक्षात घेवूनच सदर भत्ता करण्याची तरतुद नमुद करण्यात यावी , अशी मागणी करण्यात आलेली आहे .
पेन्शनधारक : पेन्शन धारकांचे वाढत्या वयानुसार आरोग्याचे मोठे प्रश्न उद्भवत असतात , सदर आरोग्याकरीता प्रश्न विचारात घेवूनच आठवा वेतन आयोगांमध्ये वाढ करण्याची मागणी केले जात आहे . तसेच पेन्शन धारकांना आरोग्याच्या सुविधा प्राप्ती करीता वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती देण्याची मागणी केली जात आहे .
तसेच दरमहा वेळेवर पेन्शन दिली जावी , तसेच पेन्शन रक्कम काढण्यासाठी , एटीएम , ऑनलाईन बँकींग सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे .