सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी खुशखबर ; पेन्शन गणनाची सुविधा , योगदानाची वाढ , पेन्शन हमीची मोठी महत्वपुर्ण वृत्त .

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ government employee pension related update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी केंद्र सरकारने युनिफाईड ( UPS ) पेन्शन योजना दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन लागु करण्यात आलेली आहे . या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .

पेन्शन गणना प्रणाली सादर : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ऐवजी युनिफाईड पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना या पैकी एका पेन्शन योजनाचा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे .

परंतु या दोन्ही पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेत अधिक लाभ मिळेल , याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रता निर्माण झालेली आहे . यामुळे वित्त विभाग ( डीएफएस ) मार्फत NPS व UPS पेन्शन मधील पेन्शन गणना ( कॅल्क्युलेटर ) सरकारकडे सादर करण्यात आले आहेत .

सदर पेन्शन गणना ( कॅल्क्युलेटर ) लवकरच सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला जाईल .ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प देताना या ( कॅल्क्युलेटर ) गणनेचा फायदा होणार आहे . याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासन सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप पेन्शन विकल्प सादर केला नसल्याने , कॅल्क्युलेटर  सादर करण्यात आला आहे .

सरकारी योगदानामध्ये वाढ : राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन व डी.ए च्या 10 टक्के योगदान कपात केले जाते ,तर सरकारचे योगदान हे 14 टक्के वरुन 18.5 टक्के इतका वाढविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . हा लाभ एनपीएस प्रणालीचा विकल्प देणाऱ्यांच होईल .

हे पण वाचा : खुल्लर समिती ( वेतन त्रुटी) अहवाल बाबत महत्त्वपुर्ण टिप्पणी..

पेन्शन हमी : युपीएस पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या 12 महिन्यांच्या मुळ वेतनाच्या सरकारीची रक्कमच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे . हा लाभ 25 वर्षे सेवा करणाऱ्यांनाच दिला जाणार आहे , यांमध्ये किमान 10 वर्षे सेवा झालेल्यांना किमान 10,000/- रुपये इतकी पेन्शन मिळेल .

यामुळे युपीएस पेन्शन प्रणालीमध्ये खात्रीशिर पेन्शनची हमी आहे . राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मध्ये मोठी रक्कम प्राप्त होवू शकते , परंतु सदर रक्कम ही शेअर बाजारावर आधारीत असल्याने , जोखीम अधिक आहे .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment