पुढील 24 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार तुफान पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !

Spread the love

@Khushi Pawar प्रतिनिधी [ Heavy rain alert issued in these districts of the state in the next 24 hours ] : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तुफान पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे .

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात ( दिनांक 7 जुलै ) राज्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाची शक्यता वर्ततिवण्यात आलेला आहे . तर काही जिल्ह्यांमध्ये अति-मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हवामान अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेला आहे . यामुळे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . याशिवाय सातारा , पुणे घाटमाथा तसेच कोल्हापुर घाटमाथा परिसरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : BMC पालिका प्रशासन अंतर्गत आताचे नवीन पदभरती ..

त्याचबरोबर सांगली , सातारा , कोल्हापुर , पुणे , सोलापुर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .तसेच परभणी , हिंगोली , जालना , नांदेड तसेच धाराशिव , लातुर  बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

तसेच नाशिक , धुळे या जिल्ह्यांत विजेच्या कडाक्यांसह तर पावसाची शक्यता आहे , तर विदर्भांमध्ये नागपुर , गोंदिया , गडचिरोली , चंद्रपुर , भंडारा , अमरावती , वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .  

Leave a Comment