राज्यातील “या” जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Holiday declared for schools in these districts of the state due to heavy rains ] राज्यामध्ये सध्या गडचिरोली , नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे . याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची संततधारा सुरू आहे . यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .

नुकतेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर , वर्धा , भंडारा , गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस सुरू आहे . हा पाऊस रविवारपासून सुरू असून , सध्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणीच्या नदी –  नाल्यांना पूर आला आहे . वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात यशोदा नदीपात्रात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने , अनेक गावांचा संपर्क तुटला आहे .

नागपूर मध्ये अति मुसळधार पावसामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे . हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र ; GR निर्गमित दि.08.07.2025

यामुळे नागपूर , वर्धा भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने , अंगणवाड्या , शाळा , महाविद्यालय त्याचबरोबर शिकवणी क्लासेस यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर विदर्भातील ज्या गावांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहेत ,  अशा गावातील शाळा , महाविद्यालय बंद करण्याचे निर्देश संबंधित स्थानिक प्रशासन यांच्याकडून निर्णय घेतले जाणार आहेत .

सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील देवळी , हिंगणघाट या तालुक्यामध्ये तुफान मुसळधार पाऊस होत असल्याने , सदर तालुक्यातील गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे . याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तातडीची मदत सुरू आहे .

Leave a Comment