Khushi Pawar प्रतिनिधी [ How much salary will the posts of teachers, clerks, class-4 employees etc. in the state government service get in the Eighth Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्याच्या अनुषंगाने कामकाज सुरु केले असून ,दिनांक 01.01.2026 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन ( 8 वा ) वेतन आयोग प्रत्यक्ष लागु केला जाईल .
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागु केल्यानंतर सदर वेतन आयोगाचा अभ्यास करुन राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आयोग लागु करण्यात येईल , यांमध्ये कमाल 2.50 पट फिटमेंट फॅक्टर नुसार संभाव्य ( अंदाजित ) किमान मुळ वेतन किती होईल . ते पुढीलप्रमाण जाणून घेवूयात ..
पे लेव्हल | 7 वा वेतन आयोगानुसार किमान मुळ वेतन | 8 वा वेतन आयोगानुसार संभाव्य किमान मुळ वेतन |
S – 1 | 15000 | 20,000 |
S – 2 | 15300 | 21,500 |
S – 3 | 16600 | 22,500 |
S – 4 | 17100 | 23,800 |
S – 5 | 18000 | 24,500 |
S – 6 | 19900 | 25,500 |
S – 7 | 21700 | 26,800 |
S – 8 | 25500 | 30,500 |
S – 9 | 26400 | 31,400 |
S – 10 | 29200 | 34,200 |
वरील तक्त्यानुसार राज्यातील पहिले 10 पे लेव्हलचे संभाव्य वेतनस्तर 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे असतील . यांमध्ये किमान मुळ वेतनांमध्ये साधारणपणे 5,000/- रुपये इतका फरका पडणार आहे . सदर वाढ ही पे – लेव्हल नुसार असणार आहे .
शिक्षकांना किती पगार मिळणार ? : राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा सुरुवातील पगार हा एस- 10 मध्ये 29,200/- रुपये इतका असतो ,तर आठवा वेतन आयोगामध्ये 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे प्राथमिक शिक्षकांचा किमान मुळ वेतन हे 34,200/- रुपये इतका होईल . तर माध्यमिक शिक्षकांना 40800/- इतके किमान मुळ वेतन मिळेल . तर उच्च माध्यमिक शिक्षकांना किमान मुळ वेतन हे 50,700/- रुपये इतके किमान मुळ वेतन मिळेल .
लिपिकांना किमान मुळ वेतन किती मिळेल : लिपिकांचे 7 व्या वेतन आयोगामध्ये किमान मुळ वेतन हे 19900/- रुपये इतके आहे , तर 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे लिपिकांच्या किमान मुळ हे 24,900/- रुपये इतके होईल .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोग संदर्भात महत्वपूर्ण मुद्दे ; जाणून घ्या सविस्तर .
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन : 2.00 पट फिटमेंट फॅक्टर नुसार शिपाई पदाचे किमान मुळ वेतन हे 20,000/- रुपये तर इतर स्वयंपाकी , कामाठी , सफाईगार , चौकीदार इ. पदांचे किमान मुळ वेतन हे 21,000/- रुपये इतके होईल . तर आठवा वेतन आयोगांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी एकच पे – स्केल तयार करण्याची शक्यता आहे . ज्याचे किमान मुळ वेतन हे 20,000/- रुपये इतके होईल .
पोलिस शिपाई , तलाठी : पोलिस शिपाई पदास सध्या एस – 7 मध्ये वेतन मिळते , तर आठवा वेतन आयोगानुसार 26,700/- रुपये इतकी वाढ होईल . तलाठीचे किमान मुळ वेतन हे 30,500/- रुपये इतके होईल .
एकंदरित 2.00 पट फिटमेंट फॅटर नुसार , आपल्या पे – स्केल मधील किमान मुळ वेतनांमध्ये 5,000/- रुपये इतके मिसळल्यास आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी मिळेल .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..