Khushi Pawar प्रतिनिधी : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गातील बदली बाबत , ग्राम विकास मार्फत 02 महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत , सदर परिपत्रकातील बाबींचा विचार बदली करताना घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
ग्रामविका विभाग मार्फत दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा ) सर्व यांच्या प्रती सादर करण्यात आले आहेत कि , दिनांक 28 मार्च 2025 रोजीच्या पत्रांमध्ये नमुद असणारा मुद्दा क्र.अ मधील 02 मध्ये विनंती अर्ज करुनही हे शब्द वगळण्याचे निर्देश दिले आहेत .
तसेच दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार याचिकाकर्ते शिक्षकांची बदली बाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत .
यांमध्ये नमुद आहे कि , दिनांक 15 फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयामधील नमूद करण्यात आलेल्या बाबींचा विचार करून , महिला शिक्षकांना दुर्गम भागामध्ये नियुक्ती (पदस्थापना ) दिली जावू नये , अशी बाब नमुद आहे . त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदर याचिका कर्ते शिक्षकांच्या बदलीबाबत आवश्यक ती नियमोचित कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , सदर निर्देश हे जिल्हा परिषद सातारा , पुणे , ठाणे व पालघर यांना देण्यात आलेले आहेत .