Latest Breaking News : आताच्या काही प्रमुख चालू घडामोडी ; वाचा सविस्तर..

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ latest Breaking news see detail ] : आताच्या काही प्रमुख चालू घडामोडी (latest current affairs ) खालील प्रमाणे जाणून घेवूयात..

01. वक्त बोर्ड विधियक : नुकतेच केंद्र सरकारने वक्त बोर्ड  संसदेत पास करून मंजुरी दिली आहे . या निर्णयावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की , सदर कायदा केवळ अंबानी यांचे घर वक्त प्रॉपर्टीवर असल्याने , ते घर वाचवण्यासाठी हा कायदा पास केल्याचा आरोप केले आहे .

02. शेतकऱ्यांची कर्जमाफी : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मुद्दा महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये होता . यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल , असे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून देण्यात आले आहे .

03. घरकुलासाठी वाढीव अनुदान : घरकुलासाठी वाढीव अनुदानाची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे . घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यास 120,000/- रुपये दिले जाते ,  आता यामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढीत तरतूद करण्यात आली आहे . यापैकी 15,000/- रुपयांचे घरावरती सोलर यंत्रणा लावावी लागणार आहे .

04. चलनात दहा व पाचशेच्या नवीन नोटा येणार : चलनामध्ये 10/-  रुपये व 500/-  रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती भारतीय रिझर्व बँकेकडून (RBI ) देण्यात आली आहे .

05. बच्चू कडू विधान परिषद निवडणुकीच्या तयारीत : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची 2024 च्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर , आता सन 2026 मध्ये होणाऱ्या शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे . अमरावती शिक्षक मतदार संघातील अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ दिनांक 06 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे . यामुळे या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार बच्चू कडू आग्रही असल्याची बातमी समोर येत आहे .

Leave a Comment