Khushi Pawar प्रतिनिधी ( Current Affairs ) : आत्ताची राज्य , देश – विदेशातील काही प्रमुख ( टॉप ) चालु घडामोडी या वृत्तांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात ..
केंद्र सरकारकडून 35 औषधांवर घालण्यात आली बंदी : वैज्ञानिक चाचण्या व सरकारच्या मंजुरीशिवाय बाजारांमध्ये विक्रीसाठी आलेल्या 35 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे . यानुसार सदर 35 औषधांचे नावे लवकरच सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत .
बाबा वेंगाच्या भविष्यवाणी : जपानमधील बाबा वेंगा यांच्या बऱ्याच भविष्यवाणी ह्या खऱ्या ठरल्या आहेत , त्यांने आता नुकतेच केलेल्या भविष्यवाणी संदर्भात पृथ्वीवर मोठा संकट येणार आहे . त्यांनी केलेल्या भविष्यवाणी मध्ये पृथ्वीवर या वर्षी युरोपीय देशांमध्ये नैसर्गिक संकट येणार असल्याचे भाकित करण्यात आले आहे . तसेच त्यांनी केलेली भविष्यवाणी मध्ये सन 5079 मध्ये संपुर्ण मानवजातीचा विनाश होईल , असे भाकित केले आहे .
लता मंगेशकर पुरस्कार : लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी पुरस्कार दिला जातो , यंदाच्या सन 2025 चा पुरस्कार चार जनांना जाहीर झाला आहे . यांमध्ये सिनेमासृष्टीतील 04 तर उद्योग जगतातील एकास हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे . सिनेमासृष्टीतील श्रद्धा कपुर , सचिन पिळगावकर , सूनिल शेट्टी , सोनाली कुलकर्णी तर उद्योग क्षेत्रातील कुमार मंगलम बिर्ला अशा 05 जणांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे .
चीन हा भारताचा व्यापरी भागीदार : चीन- भारत मधील भारताची व्यापारी तुट ही 99.2 अब्ज डॉलर इतकी झाली आहे , अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे चीन देशाने भारतासोबत व्यापार अधिक मोठ्या प्रमाणात वाढवला असून , भारतीय कंपन्यांनी चीन मधून 113.5 अब्ज डॉलरची आयात केली आहे तर त्या तुलनेत मागील महिन्यांपासुन केवळ 1.5 अब्ज डॉलरची केली असल्याने व्यापरी तुट ही 99.2 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे .
शक्तीशाली देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी : शक्तीशाली देशांच्या यादीमध्ये भारताने चौथे स्थान गाठले आहे . प्रमुख 60 देशांच्या सर्वेक्षणांमध्ये अमेरिका प्रथम , रशिया दुसऱ्या तर चीन तिसऱ्या स्थानी असून भारत चौथ्या स्थानी आहे . भारताकडे 51.37 लाख लष्करी जवान , 4201 रणगाडे तर 2229 विमाने आहेत , तर अणुशक्ती संपन्न देशांमध्ये भारत अग्रेस्थानी आहे .
पश्चिम बंगाल मधील अराजकता मुळे राष्ट्रपती शासन लागु करण्याची मागणी : पश्चिम बंगाम मध्ये वक्त कायद्यावर मोठ्या प्रमाणात अराजकता माजली असून , आंदोलन कर्त्यांकडून हिंसक वळण घेत असून धार्मिक दंगली होत आहेत . यामुळे हिंदु समाजाच्या वतीने पश्चिम बंगामध्ये राष्ट्रपती शासन लागु करण्याची मागणी केली जात आहे .
पाऊसमान : दरवर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा 105 टक्के पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे .
जिओचा नविन स्वस्त प्लॅन : जिओने नविन 90 दिवस वैध प्लॅन आणला आहे , यांमध्ये ग्राहकांना 90 दिवस फ्रि कॉलिंग तर 200 एमबी डेटा तर ओटीटी फ्रि मिळणार आहे . या प्लॅनची किंमत ही 899/- रुपये इतकी असणार आहे .