राज्य कर्मचाऱ्यांना 55% दराने डी.ए वाढ बाबत अखेर वित्त विभाग मार्फत GR निर्गमित दि.11.08.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Mahagai bhatta vadh shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2025 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर 2 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत , अखेर वित्त विभाग मार्फत दिनांक 11.08.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न हा राज्य सरकारच्या विचाराधीन होता .

यानुसार आता सरकार असा आदेश देत आहे कि , दि.01.01.2025 पासुन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 53 टक्के वरुन 55 टक्के करण्यात आलेला आहे .

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 01.01.2025 ते दिनांक 31.07.2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट 2025 च्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच महागाई भत्ताची रक्कम प्रदान करण्या संदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागु राहतील असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच या बाबीवर होणारा खर्च हा संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment