Khushi pawar प्रतिनिधी [ Mahajyoti Scheme: Free Tab and Net facilities for 10th pass students; Also free coaching scheme for JEE / NEET / MHT – CET exams ] : महाज्योती योजना अंतर्गत इयत्ता दहावी मध्ये उत्तम गुणांने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅब व नेट सुविधा सह तसेच JEE / NEET / MHT – CET परीक्षा मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहेत .
या प्रशिक्षण योजना करीता आवश्यक अर्हता : विद्यार्थी राज्याचा रहीवाशी , विद्यार्थी हा इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती – भटक्या जमाती त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्ग मधील असावा ( नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा / असावी ) .
सन 2025 मध्ये इयत्ता दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावे , सदर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असावा , निवड ही इयत्ता 10 वी प्राप्त टक्केवारी नुसार करण्यात येईल .
आवश्यक कागदपत्रे : आधार , रहिवासी दाखला , जातीचे दाखला , नॉन क्रिमिलेअर , 10 वी गुणपत्रक , 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला बाबत बोनाफाईट व प्रवेश पावती , दिव्यांग / अनाथ असल्यास प्रमाणपत्र .
हे पण वाचा : कर्मचारी वेतन अनुदान अदा करणे व सेवा समाप्ती बाबत महत्त्वपुर्ण GR निर्गमित ..
प्रवर्ग निहाय आरक्षण टक्केवारी :
अ.क्र | प्रवर्ग | आरक्षण टक्केवारी |
01. | OBC | 59% |
02. | VJ- A | 10% |
03. | NT-B | 08% |
04. | NT-C | 11% |
05. | NT-D | 6% |
06. | SBC | 6% |
अर्ज प्रक्रिया : नमुद पात्र विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.in या संकेतस्थळावर दिनांक 31.05.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीकरीता अधिकृत्त परिपत्रक डाउनलोड करा