गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली धोरणामध्ये मोठी सुधारणा ; शासन निर्णय निर्गमित दि.23.05.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Major improvement in the intra-district transfer policy of Group C and D cadre employees ] : गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 23 मे रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे दिनांक 15 मे 2014 रोजीच्या बदली प्रक्रिया मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद मधील गट क व गट ड संवर्गामधील कर्मचाऱ्यांचे बदली धोरण ग्राम विकास विभागाच्या दिनांक 15.05.2024 नुसार निश्चित केले जाते .

सदर शासन निर्णयांमध्ये जिल्हास्तरीय बदली यांमध्ये प्रशासकीय बदली मधील मजकुर वगळण्यात येत आहे . तर बदलीचा प्रकार व बदलीची टक्केवारी नमुद करण्यात आलेली आहे .

बदली प्रकार ( अ ) प्रशासकीय बदली : गट क संवर्ग मधील जिल्हा परिषद कर्मचारी ( यांमध्ये प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळुन ) संबंधित नक्षलग्रस्त / आदिवासी तालुक्यामधून इतर तालुक्यात व ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी / नक्षल ग्रस्त तालुका नसेल अशा जिल्ह्यात एका तालुक्यामधून अन्य तालुक्यात बदली करण्याचे प्रमाण हे 10 टक्के इतके निश्चित करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचारी करीता 55% DA वाढ बाबत महत्त्वपुर्ण बातमी .

परंतु सदरची टक्केवारीचे प्रमाण निश्चित करताना नक्षलग्रस्त किंवा आदिवासी भागामधील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांने सदर तालुक्यामधून बदली न करण्याची विनंती केली , तर सदर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदली प्रक्रिया मधून वगळण्याचे निर्देश आहेत .

पण सदर नियमानुसार एकही बदलीपात्र कर्मचारी न बसल्यास , संवर्ग नुसार किमान 1 किंवा 02 कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment