Khushi Pawar प्रतिनिधी [ New Pay Commission Committee begins its preliminary work ] : केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार नविन वेतन आयोगाच्या स्थापनेच्या मंजूरीनंतर आता सदर समितीचे प्राथमिक कामकाजास सुरुवात झाली आहे .
केंद्र सरकारच्या कार्मिक लोक शिकायत व पेन्शन मंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग मार्फत दिनांक 13 मे 2025 रोजी राज्यातील सर्व राज्य सरकारी मुख्य सचिव तसेच भारत सरकारच्या मंत्रालयीन विभागाच्या सर्व सचिव यांना सदर पत्र सादर करण्यात आले आहेत .
सदर पत्राचा प्रमुख विषय म्हणजे केंद्रीय आठवा वेतनाच्या उप- सचिव / निदेशकांच्या 04 पदावर प्रतिनियुक्तीने पदभरती करीता राज्याचे सर्व सचिव व भारत सरकारच्या सर्व मंत्रालयीन सचिव यांच्याकडून आवेदन मागविण्यात आले आहे .
सदर आवेदन सादर करण्याची अंतिम दिनांक ही दिनांक 22.04.2025 रोजीच्या पत्रानुसार दिनांक 10 जुन 2025 पर्यंत असणार आहेत . सदर आवेदन हे संबंधित विभागास पत्राद्वारे अथवा ई/ मेल द्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या पत्रामुळे आठवा वेतन आयोगाचे प्राथमिक कामकाज सुरु झाल्याचे निर्दशनास येत आहे . या प्राथमिक कामकाजानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगासाठी निश्चितच वेळ लागणार आहे . दिनांक 01.01.2026 रोजी लागु होणार आठवा वेतन आयोग हा ऑगस्ट / सप्टेंबर 2025 पर्यंत लांबण्याची शक्यता आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना घर बांधणी/ नविन खरेदी कामी अग्रिम मंजूर करणे करीता सुधारित GR .
आठवा वेतन आयोगाची समिती गठीत करण्याचे कामकाज तसेच आवश्यक अधिकारी / कर्मचाऱ्यांची पदभरती केंद्र सरकारच्या कार्मिक विभागांकडून करण्यात येत आहे .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..