आठवा वेतन आयोग ( New Pay commission) बाबत आताची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण बातमी ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ new pay commission new update ] : आठवा ( नविन) वेतन आयोग संदर्भात आत्ताच्या घडची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे . सदर अपडेट नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करणे , संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी कर्मचारी संघटनांकडून केंद्र सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले आहे .

नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी स्टाफ गाइड ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी महत्त्वपूर्ण संघटना कार्यरत आहे . या संघटनेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार , केंद्र सरकारकडे आठवा वेतन आयोग ( New Pay commission ) संदर्भात काही महत्त्वपूर्ण मुद्द्यावर निवेदन सादर करण्यात आली आहे .

किमान फिटमेंट फॅक्टर ( fitment factor ) : वेतन आयोग हा फिटनेस फॅक्टर आधारावर ठरला जातो , आठवा वेतन आयोगामध्ये किमान फिटमेंट फॅक्टर 2.00 पट इतका निश्चित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .

नवीन वेतन आयोग समितीचे गठन व कामकाज : केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगास मंजुरी दिली आहे , परंतु वेतन आयोग समितीची स्थापना अद्याप केली नाही , सदर समितीचे गठन लवकरात लवकर करून , कामकाज सुरू करण्याची मागणी कर्मचारी संघटनाकडून करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : सुधारित वेतन त्रुटी अहवाल , जाणून घ्या सविस्तर ..

किमान मूळ वेतनात वाढ : सदर नवीन वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 8,000/- रुपये ( 2.00 पट फिटमेंट फॅक्टर नुसार ) इतकी वाढ होवू शकते .

नवीन वेतन आयोगात पेन्शन वाढीची मागणी : नवीन वेतन आयोगानुसार , सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शनमध्ये देखील वाढ करण्याची मागणी पेन्शनधारकांकडून केली जात आहे . त्याचबरोबर पेन्शनमध्ये नियमित वाढ करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे .

Leave a Comment