Khushi Pawar प्रतिनिधी : मुंबई वृत्त – सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोग (8th pay commission ) लागू करण्याचे केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे . या संदर्भात सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या मनामध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहे , या संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .
नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार ? : नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग (new pay commission) शासकिय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 01.01.2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे . परंतु सध्याची केंद्रीय स्तरावरील वेतन आयोग संदर्भातील हालचाली पाहता , सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होण्यास किमान एक वर्षाचा विलंब होऊ शकतो , म्हणजेच सन 2027 पर्यंत नवीन वेतन आयोग (8th Pay commission) लागू केला जाऊ शकेल .
वेतनामध्ये किती वाढ होणार ? : नवीन वेतन आयोगामध्ये मूळ वेतनामध्ये वाढ होते . सदर वाढ फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर अवलंबून असते , कर्मचारी संघटनांकडून किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे . यानुसार किमान मूळ वेतनात , 6000/- ते 8000/- हजार रुपयांची वाढ होईल .
महागाई भत्ता व इतर देय भत्ते मध्ये किती वाढ होईल ? : नवीन वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता हा शून्य टक्के इतका होईल, तर इतर देय असणाऱ्या भत्त्यामध्ये मोठी वाढ होईल .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होईल ? : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग (8th pay commission ) हे केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू केला जाईल . यानुसार केंद्र सरकारने सन 2027 मध्ये नवीन वेतन आयोग लागू केल्यास, महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे .
पेन्शनमध्ये वाढ होईल का ? : नवीन वेतन आयोग लागू झाल्यास , सदर वेतन आयोग सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये देखील वाढ करण्याची तरतूद केली जाते , यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात येईल .