Khushi Pawar प्रतिनिधी [ Policy regarding transfers of state employees through counselling; Revised Government Decision – S.P. Department. ] : सन 2005 च्या बदली अधिनियम नुसार राज्य कर्मचाऱ्यास एका पदावरील ( एका आस्थापनेवर ) साधारण पणे 03 वर्षे इतका कालावधी पुर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण बदलीकरीता पात्र ठरतो .
समुपदेशन करीता पात्र अधिकारी / कर्मचारी : राज्यातील गट ब , क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे समुपदेशन द्वारे बदली धोरण लागु करण्यात आलेले आहेत , यांमध्ये पोलिस दल मधील कर्मचारी , व मंत्रालयीन संवर्ग व गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांना सदर धोरणातुन वगळण्यात आले आहेत .
सर्वसाधारण बदल्या : माहे एप्रिल / मे महिन्यांमध्ये सेवाचा पदावधी पुर्ण झालेले सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या समुदपदेशन धोरण नुसार करण्यात येते .
मुदतपुर्व व मध्यावधी बदली : प्रशासनाची निकल अथवा कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार सदर बदल्या केली जाते , व सदर बदली वर्षभर चालु असणारी प्रक्रिया आहे . सदरच्या बदल्या ह्या समुपदेशन धोरण नुसार केली जात नाही .
सदर शासन निर्णयामध्ये समुदपदेशन द्वारे गट क कर्मचाऱ्यांचे बदली करणेबाबत , मार्गदर्शक तत्वे नमुद करण्यात आलेले आहेत , यांमध्ये संबंधित प्राधिकारी कार्यालयाने आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे , अवघट / बिगर अवघड क्षेत्र मधील कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करणे इ. माहिती प्रसिद्ध करण्याचे कामकाज असते .
समुपदेशन बदलीचे काही महत्वपुर्ण मुद्दे : बदल्या ह्या एकाच सेवाज्येष्ठता यादीमधील कर्मचाऱ्यांमधून करण्याचे निर्देश , ज्या सेवाजेष्ठता यादी ठेवण्यात येते त्याच स्तरावर करण्याचे आदेश , तसेच सर्वसाधारण बदल्या करताना कायद्यांचा भंग करण्यात येवू नयेत . रिक्त पदे हे समप्रमाणात भरण्यात यावेत तसेच अवघड क्षेत्रामधील रिक्त पदे प्रथम प्राधान्याने भरण्याचे निर्देश .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय (GR)
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..