Khushi Pawar प्रतिनिधी [ Possible revised pay scales for pay levels 1 – 10 in the Eighth Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापासुन दिनांक 01.01.2026 नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) लागु केला जाणार आहे . सदर वेतन आयोगांमध्ये पे-लेव्हल 1-10 पर्यंतचे संभाव्य सुधारित वेतनस्तर कसे असतील याबाबतचा संपुर्ण वेतन अहवाल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
आठवा वेतन आयोगांध्ये प्रमुख बदल : आठवा वेतन आयोगांध्ये कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी इन हॅन्ड वेतन वाढविण्यात येणार आहेत , म्हणजेच कपाती कमी प्रमाणात होणार आहेत . कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार आर्थिक स्वरुपात पारितोषिकाची तरतुदी करण्यात येणार आहेत .
नविन वेतन आयोग समिती : सध्य स्थितीत आठवा वेतन आयोगाची स्थापना करुन त्यामध्ये उप-समितीची स्थापना करण्यात आली आहे , याशिवाय सल्लामसलत समितीकडून कर्मचारी संघटना व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे . तसेच मसुदा व कायदेविषयक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .
सुधारित संभाव्य वेतनस्तर : कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार किमान फिटमेंट फॅक्टर 2.00 पट तर कमाल 2.50 पट फिटमेंट फॅक्टर नुसार सुधारित वेतनस्तर निश्चित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . यांमध्ये 2.50 पट फिटमेंट फॅक्टरनुसार प्रस्तावित किमान मुळ वेतनाचा तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .
पे-लेव्हल | सध्याचे किमान मुळ वेतन (7 वा वेतन आयोगानुसार) | संभाव्य किमान मुळ वेतन ( 8 वा वेतन आयोगानुसार) |
पे लेव्हल -01 | 18,000 | 25,000 |
पे लेव्हल -02 | 19,900 | 27,000 |
पे लेव्हल -03 | 21,700 | 30,000 |
पे लेव्हल -04 | 25,500 | 35,000 |
पे लेव्हल -05 | 29,200 | 40,000 |
पे लेव्हल -06 | 35,400 | 50,000 |
पे लेव्हल -07 | 44,900 | 60,000 |
पे लेव्हल -08 | 47,600 | 65,000 |
पे लेव्हल -09 | 53,100 | 70,000 |
पे लेव्हल -10 | 56,100 | 75,000 |
वरील तक्ता नुसार आठवा वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 2.5 पट नुसार संभाव्य किमान मुळ वेतन असतील .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..