Khushi Pawar प्रतिनिधी [ Business Ideas ] : आपण मराठी लोकं व्यवसाय करायला खुप लाजत असतो , तर हेच सिंधी , मारवाड , बिहारी लोकांच्या रक्तातच व्यवसाय करण्याचा अंश असतो . त्या लोकांनुसार आपण देखिल आपल्यात बदल करुन व्यवसायाला सुरुवात करु शकता .
व्यवसाय करण्यासाठी प्रथम आपल्यामध्ये जिद्द हवी असते , त्यानंतर भांडवलचा विचार करायचा , आपण पहिल्यांदाच भांडवल कसा मिळेल , व्यवसाय चालेल कि नाही अशा प्रकारचे विविध विचार आपल्या मनात सुरु असतात . तर आपण जर स्पर्धेत उडीच मारली नाही , तर व्यवसाय कसा होईल असा प्रश्न आपल्याला पडला पाहीजे .
आपण व्यवसाय करण्यासाठी शहरी भागातच जावे लागेल असे काही नाही , तर आपण ग्रामीण भागांमध्येच राहून व्यवसायाची सुरुवात करु शकता . असे कोणकोणते व्यवसाय आहेत , जे कि आपण ग्रामीण भागात राहून व्यवसाय करु शकतो , अशा व्यवसायांची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.शेळीपालन : शेळी पालन हा शेतीपुरक व्यवसाय असून आपण सहज अशा प्रकारच्या व्यवसायाची सुरुवात करतो , परंतु आपण शेळी पालनाचा व्यवसाय हा मर्यादीत स्वरुपाचा करतो , यामुळे आपणांस शेळी पालन व्यवसायात देखिल फायदा सापडत नाही . तर आपण हा व्यवसाय व्यापक स्वरुपात केल्यास , आपणांस मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल .
व्यापक स्वरुपात शेळी पालन हे अधिक शेळ्यांचा गट ( एका गटामध्ये 10 शेळी + 02 बोकड ) अशा गट निहाय मोठ्या प्रमाणात करु शकता . त्यानंतर आपण प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत बोकटांची विक्री केल्यास , आपणांस अधिक फायदा मिळेल . त्यानंतर शेळीपालनांच्या विष्ठेची खत म्हणून देखिल विक्री करु शकता , याशिवाय शेळीच्या दुधाचे देखिल बाजारात मागणी असून ते दुध विक्री करुन देखिल फायदा मिळवू शकता .
02.दुग्धव्यवसाय : दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा परवडत नाही , कारण दुध आपण दुध डेअरी मध्ये देतो . ज्याठिकाणी आपणांस दुधाचे दर कमी मिळतो , यामुळे दुध विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास , आपणांस अधिक चांगला दर मिळेल . याशिवाय दुग्धव्यवसायासाठी उत्तम प्रजातीच्या गाई / म्हशींची निवड करावी , व त्यांची नियमित निगा राखावी .
शेतीपुरक द्वितीय क्षेत्रातीलय व्यवसाय : शेतीमालाला प्रक्रिया करणारे द्वितीय क्षेत्रातील उद्योग लहान क्षेत्रात सुरु करुन चांगली कमाई करु शकता . जसे कि , डाळ निर्मिती ,भरड धान्यावरील प्रक्रिया , सोया पेंड निर्मिती , मसाले पदार्थावर प्रक्रिया अशा विविध मालावरील प्रक्रिया करणारे व्यवसाय करुन चांगली कमाई करु शकता ..
व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून अर्थसहाय्य मिळवू शकता . याकरीता आपण करत असणारे व्यवसायाचा संपुर्ण तपशिल हा नोंदणीकृत असणे आवश्यक असेल , अशा नोंदणीकृत व्यवसायाला बँकेकडून अनुदान स्वरुपात कर्ज उपलब्ध करुन दिले जाते .