Rain Update : राज्यात पुढील 24 तासात या भागात बरसणार मेघ-गर्जनासह गारपीटीचा पाऊस ; जाणून घ्या हवामान अंदाज !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी ( Rain Update ) : – पुढील 24 तासात राज्यातील काही भागामध्ये मेघ – गर्जनासह गारपीटीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे . राज्यात सध्या मराठवाडा व विदर्भ भागात उन्हाची तिव्रता वाढली असून , नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे .

उन्हाचे तापमान : विदर्भात सर्वाधिक तापमानाचे नोंद घेण्यात आलेली आहे , या भागांमध्ये उन्हाचे तापमान 43-44 अंश सेल्सिअर इतके उच्च तापमान नोंदवले गेले आहे .यामुळे विदर्भातील नागरिकांना उष्माघातासारखे आजाराचा सामाना करावा लागत आहे .

तर बंगालच्या उपसागरातुन निर्माण झालेल्या दमट वाऱ्यांमुळे राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सदर वाऱ्यांचा परिणाम म्हणून पुढील 24 तासांमध्ये गोंदिया , चंद्रपुर , गडचिरोली , वर्धा , अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

मराठवाडा / मध्य महाराष्ट्र : मराठवाडा व मध्य महाराष्ट्राचा विचार केला असता  , यांमध्ये धाराशिव , लातुर , सोलापुर , सांगली , कोल्हापुर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

सदर पावसामुळे पुढील 24 तासात राज्यात उन्हाचा तडाखा थोडासा कमी होणार , असल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळणार आहे .

Leave a Comment