गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र ; GR निर्गमित दि.08.07.2025

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ Smart ID card for officers/employees to curb criminal activities ] : गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र तयार करणेबाबत , राज्य सरकारच्या गृह विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .

सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बनावट ओळखपत्रांच्या आधारे गुन्हेगारी कृत्ये घडण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहेत . यामुळे आता राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता स्मार्ट पद्धतीने ओळखपत्र तयार करण्याचे काम सुरु आहे . प्रथमत : गृह विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता स्मार्ट ओळखपत्र तयार करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .

यांमध्ये बृहन्मुंबई पोलिस दल मधील कार्यरत पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र खरेदी करण्यास पोलिस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अधिनस्त निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे .

स्मार्ट ओळखपत्र बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रादेशिक विभाग / घटक कार्यालये तसेच शाखा अधिनस्त कार्यरत पोलिस अधिकारी / कर्मचारी अंमलदार यांच्याकरीता स्मार्ट ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे . याकरीता 4.00 कोटी रुपये इतका निधी प्रदान करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

या स्मार्ट ओळखपत्रामुळे नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे . या ओळखपत्रांमध्ये कर्मचाऱ्यांचे डिजिटल पद्धतीने रेकॉर्ड नमुद असणार आहे . यामुळे अधिकारी / कर्मचाऱ्यांची ओळख पटण्यास तसेच इतरही सुरक्षांच्या बाजुसाठी सदर ओळखपत्र वापरले जावू शकतील .

Leave a Comment