Khushi Pawar प्रतिनिधी (Result ) : SSC / HSC बोर्ड परिक्षा 2025 परीक्षेचा निकाल संदर्भात आताच्या महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे बोर्डाकडून निकालाची अंतिम संभाव्य (Final result date ) तारीख जाहीर करण्यात आलेली आहे , यानुसार निकालाची तारीख मे महिन्यात असणार आहे .
बोर्डाकडून निकालाचे कामकाज युद्ध पातळीवर : बोर्डाकडून दहावी (SSC ) व बारावीचा (एचएससी ) निकाल तयार करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे . ज्यामुळे निकालाची संभाव्य तारीख जवळ-जवळ निश्चित करण्यात आलेली आहे . यंदाच्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरण (new education policy) लागू केले जाणार आहेत . त्या अनुषंगाने निकाल देखील दरवर्षीपेक्षा लवकरच जाहीर केला जाणार आहे .
निकालाची संभाव्य तारीख (Board Exam result ) : महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष श्री.शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार , इयत्ता दहावी (SSC ) व बारावीचा (HSC ) बोर्ड परीक्षाचा निकाल येत्या 15 मे 2025 पर्यंत जाहीर केले जाणार असल्याची , माहिती देण्यात आलेली आहे .
निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात : प्राप्त माहितीनुसार दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल तयार करण्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात असून , लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे .
मागील वर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल हा 27 मे तर बारावीचा निकाल हा 21 मे रोजी लागला होता . परंतु यंदाच्या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा दहा दिवस अगोदरच सुरू झालेल्या होत्या . त्या अनुषंगाने दहावी व बारावीचा निकाल दहा दिवस अगोदरच लागणार आहे .
हे पण वाचा : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या नविन वेतन आयोगातील आत्ताची मोठ्या प्रमुख घडामोडी !
निकाल कसा पाहता येईल ? : दहावी व बारावीचा निकाल पाहण्याकरिता बोर्डाकडून सद्यस्थितीत आठ अधिकृत संकेत स्थळांची निवड करण्यात आली आहे . सदर संकेतस्थळावर आपण बैठक क्रमांक आईचे नाव टाईप करून निकाल पाहू शकता .
निकाल पाहण्याकरिता अधिकृत संकेतस्थळे पुढील प्रमाणे पाहू शकता ..
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
maharesult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscbordpune.in
hsc.mahresult.org.in
sscresult.mkcl.org