राज्यातील सर्वच सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55% दराने डी.ए वाढ मे महिन्यांच्या वेतन देयकासोबत मिळणार ; GR महिना अखेरपर्यंत !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh nirnay ] : महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकारी करीता केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 2 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , दिनांक 15.05.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांकडून प्रथम राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना डी.ए वाढ करणेबात शासन निर्णय निर्गमित केला जातो , त्यानंतर राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांकरीत डी.ए वाढीचा निर्णय घेतला जातो .

वाढीव डी.ए मे महिन्यांच्या वेतन देयकासोबत : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव 02 टक्के डी.ए चा लाभ दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए फरकासह माहे मे महिन्यांच्या वेतन देयकासोबत अदा करणेबाबत , या महिन्यांच्या अखेर पर्यंत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

एकुण वाढीव डी.ए 55 टक्के : सध्या राज्य कर्मचाऱ्यांना एकुण 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे , आता दिनांक 01.01.2025 पासुन एकुण 55 टक्के दराने डी.ए वाढ मिळणार आहे .

पेन्शन धारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लाभ : राज्यातील पेन्शन धारक तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .

वित्त विभाग मार्फत डी.ए वाढीचा प्रस्ताव : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 02 टक्के वाढीव डी.ए लागु करणेबाबत , वित्त विभाग मार्फत प्रस्ताव तयार करण्यात आला असून , मंजूरी करीता मुख्यमंत्री यांच्या कडे पाठविण्यात येणार आहे .

Leave a Comment