राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी महत्वपुर्ण अपडेट ; या दिवशी निर्गमित होणार महागाई भत्ता वाढीचा GR ! डी.ए वाढीवर शिक्कामोर्तब !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh nirnya update ] : केंद्र सरकारने लागु केलेला डी.ए वाढीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना 02 टक्के डी.ए वाढ कधी लागु होईल , याबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे .

वित्त विभागाकडून डी.ए वाढीवर शिक्कामोर्तब : राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्यास राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे . यामुळे राज्यातील कर्मचारी / पेन्शन धारकांना लवकरच डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे .

एकुण डी.ए व डी.ए फरकाचा लाभ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 02 टक्के वाढ दिनांक 01.01.2025 पासुन करण्यात आली आहे , त्याच धर्तीवर डी.ए वाढ लागु करण्यात येणार असल्याचे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांचा एकुण डी.ए हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे .

दिनांक 01.01.2025 पासुन महागाई भत्ता फरकाची रक्कम देखिल मिळणार आहे . या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे एकुण वेतन / तर पेन्शन धारकांच्या एकुण पेन्शन मध्ये 02 टक्क्यांची वाढ होणार आहे .

डी.ए वाढीचा निर्णय कधी ? : राज्य शासनांकडून राज्यातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्यात आला आहे , यानंतर पुढील 15-20 दिवसानंतर डी.ए वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातो .

हे पण वाचा : मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी हिताचे 02 मोठे निर्णय ; जाणून घ्या सविस्तर.

यामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुढील जुन महिन्यांच्या 15 तारखेपर्यंत घेतला जावू शकतो . केंद्र सरकारप्रमाणे डी.ए वाढीस राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून मंजूरी देखिल प्राप्त झाली आहे .

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय : प्रत्येक महिन्यात राज्य शासनांची मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाते , पुढील महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियोजित मंत्रीमंडळ बैठकीत सदर डी.ए वाढीचा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment