Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee Shasan Nirnay dated 20 May ] : दिनांक 20 मे 2025 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) पुढील खालील प्रमाणे पाहूयात .
01. बदली करण्यास सक्षम प्राधिकारी : कृषी व पदुम विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार घटक व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आला आहे . यामध्ये S 14 पेक्षा कमी वेतनश्रेणी असणाऱ्या घटक संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली ही आयुक्त , मुंबई यांच्यामार्फत करण्यात येईल . तर S- 3 व त्यापेक्षा कमी वेतनश्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली ही संबंधित प्रादेशिक उप आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येईल .
02. जूनी पेन्शन लागू करणेबाबत GR : दिनांक 01.11.2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , परंतू सदर जाहिराती नुसार दिनांक 01.11.2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या , महसूल व वन विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension ) लागू करण्यात आली आहे .
यांमध्ये लघुलेखक ( इंग्रजी ) या पदावरील श्रीम. अपेक्षा राणे यांना जूनी पेन्शन ( old pension ) लागू करण्यात आली आहे . सदर कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना लागू , NPS मधील कर्मचारी योगदान GPF खाते उघडून त्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारचे रजा संबंधी संकलित GR (PDF)
03. अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत GR : नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक , पुणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपीक राजु रामकृष्णाजी बाकडे यांचे अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
या संदर्भातील तिन्ही GR डाउनलोड करण्यासाठी Click Here
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..