राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात महत्वपूर्ण ( प्रशासकीय / विनंती बदली ) नियमावली  ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee transfer rules] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ( प्रशासकीय / विनंती ) महत्वपूर्ण नियमावली जारी करण्यात आलेली आहे . याबाबत सविस्तर नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात..

सदर बदली प्रक्रिया हि राज्य शासनाच्या बदली अधिनियम 2006 नुसार करण्यात येत आहे . सर्वसाधारण बदली पैकी 30% पदे हे प्रशासकीय बदलीस पात्र ठरणार आहेत . याकरीता जे कर्मचारी बदली पात्र आहेत , अशा कर्मचाऱ्यांचे समुपदेशनद्वारे बदली करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

प्रशासकीय बदली : ज्या कर्मचाऱ्यांचा 2 पदावधी ( किमान 06 वर्षे ) पुर्ण झाले आहेत , अशा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली करण्यात येईल . सदर कर्मचाऱ्यांची समुपदेशन द्वारे आवश्यक ठिकाणी बदली करून घेण्याचे निर्देश आहेत .

विनंती बदली : विनंती बदली करीता किमान 01 पदावधी पूर्ण होणे आवश्यक असेल , 01 पदावधी म्हणजेच किमान 03 वर्षे पुर्ण होणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : वेतन त्रुटी निवारण समिती ( खुल्लर समिती ) कामाचा घोळ ; जाणून घ्या सविस्तर..

पसंतीक्रम : बदली पात्र कर्मचाऱ्यांने बदली साठी 10 पसंतीक्रम देणे आवश्यक असेल , यामध्ये अवघड / बिगर अवघड क्षेत्राचा समावेश आवश्यक असेल . पसंतीक्रम करीता सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित विकल्प विवरण पत्र सादर करणे आवश्यक असेल .

तक्रारी बदली : तक्रारी बदली ही वर्षभर सुरु असते , यासाठी किमान सेवा कालावधीची आवश्यकतेची राहत नाही . ज्या कर्मचाऱ्या विरुद्ध तक्रारी असेल , त्यांची बदली केली जाते .

कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..

Leave a Comment