राज्य कर्मचाऱ्यांना 02 टक्के डी.ए वाढीसह चक्क 8 महिन्यांचा महागाई भत्ता फरक मिळणार ; जाणून घ्या अपडेट !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ State employees will get a 2 percent DA increase along with a difference of 8 months of dearness allowance. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबत महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .

02 टक्के डी.ए वाढ : सातवा वेतन आयोग नुसार केंद्र सरकारने लागु केलेले 02 टक्के वाढीव डी.ए राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने माहे जानेवारी 2025 पासुन केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये 02 टक्के वाढ लागु केली आहे . त्या अनुषंगानेच राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ लागु होणार आहे .

एकुण महागाई भत्ता : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 02 टक्के डी.ए वाढीमुळे एकुण डी.ए हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे .

राज्यातील सर्व कर्मचारी / पेन्शन धारकांना डी.ए वाढीचा लाभ : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी तसेच निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र असणारे अधिकारी / कर्मचारी व राज्य पेन्शन धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय होणार आहे .  

08 महिन्यांची डी.ए थकबाकी : प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ हा लवकरच लागु केला जाणार असुन , त्याबाबत अधिकृत्त वित्त विभाग मार्फत शासन निर्णय देखिल निर्गमित केला जाईल . यांमध्ये राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 असे एकुण 08 महिन्यांची डी.ए थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे .

Leave a Comment