Khushi Pawar प्रतिनिधी [ State employees are very upset over salary discrepancies; They will appeal to the court as they have not received justice. ] : वेतनत्रुटी निवारण समिती मार्फत सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याची शिफारस अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे . या अहवालानंतर विविध विभागातील तब्बल 337 संवर्गातील पदांना न्याय मिळाला नसल्याच्या तक्रारी येत आहेत .
वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाज : खुल्लर समितीने केवळ ज्या पदांच्या वेतनत्रुटी आहेत आलेल्या आहेत , अशा पदांचा विचार केला नसल्याचा निदर्शनास येत आहे , कारण संघटना मार्फत केलेल्या मागणींचा विचार केला आहे , असे अहवालानुसार दिसून येत आहे .
सदर समिती ही वेतनत्रुटी निवारण करीता गठीत करण्यात आलेली होती , यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणींचा विचार नव्हता . यामुळे सातव्या आयोगामध्ये ज्या पदांच्या खरेच वेतनत्रुटी होत्या अशा पदांना सदर समिती समोर योग्य पद्धतीने सादरीकरण / पुरावा सादर न केल्याने न्याय मिळाला नाही .
सदर समितीला 442 संवर्गातील पदांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते , परंतु यापैकी केवळ 105 पदानांच सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे . यांमध्ये ठोस पुरावा तसेच केंद्र सरकारच्या पदांना सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात आलेली वेतनश्रेणीचा अभ्यास करुन सुधारित वेतनश्रेणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे .
हे पण वाचा : अमान्य करण्यात आलेल्या पदांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार का ?
समान पद / समान काम पदाचा विचार नाही : वेतनत्रुटी असणाऱ्यापैकी काही विभागातील समान पद / समान काम तसेच समान सेवाप्रवेश असून देखिल सुधारित वेतनश्रेणीची शिफारस योग्य सादरीकरण न केल्याने सदर समितीकडून करण्यात आलेली नाही . यांमध्ये स्वीय सहाय्यक , वर्ग -4 कर्मचारी ( स्वयंपाकी ,चौकीदार, सफाईगार ,परिचर ) लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , लघुलेखक इ. पदांचा समावेश आहे .
कर्मचाऱ्यांकडून तक्रारी : सदर समितीची स्थापन ही कोर्टामध्ये दाखल याचिकेच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेली होती , ज्या कर्मचाऱ्यांने याचिका दाखल केली आहे , अशा कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने सादरीकरणासाठी पाचारण करणे आवश्यक होते .
कारण सदर याचिका कर्ते कर्मचारी समितीसमोर आपले योग्य सादरीकरण / पुरावानिशी सादर केले असते . असे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे . न्याय न मिळालेले सदर 337 संवर्गातील कर्मचारी परत न्यायालयांमध्ये दाद मागतील हे निश्चित आहे .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..