@Khushi Pawar प्रतिनिधी [ The Seventh Pay Commission changed the names of the posts and gave a big increase in the pay scale of these posts. ] : सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी मधील बदलाबाबत करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे कि , काही पदांचे पदनाम बदलुन त्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे . तर इतर पदांचे स्वरुप अधिक असुन देखिल वेतनश्रेणीत वाढ करण्याचा कोणताही विचार केला गेला नाही .
नुकतेच खुल्लर समितीने केलेल्या शिफारशीमधील 104 पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . परंतु खुल्लर समितीकडून सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेल्या पदांमध्ये कनिष्ठ पदांपेक्षा वरिष्ठ पदांचाच अधिक समावेश करण्यात आला आहे .
सातव्या वेतन आयोगांमध्ये काही पदांचे पदनाम बदलुन त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करण्यात आलेले आहेत . यांमध्ये राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये कार्यरत लिपिकांचे पदनाम कनिष्ठ लेखनिक बदलुन कनिष्ठ सहाय्यक असे करुन त्यांचे ग्रेड पे 1900/- रुपये वरुन 2400/- रुपये करण्यात आले .त्याचबरोबर चौकीदाराचे पदनाम बदलण्यात येवून कुशल परिचर असे करुन त्यांचे ग्रेड पे 1300 वरुन 1900/- रुपये करण्यात आले .
तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये कुशल कारागीर यांचे ग्रेड पे 1900/- वरुन 2400 रुपये असे करण्यात आलेले आहेत , त्याचबरोबर कर संकलन विभाग मध्ये लिपिकांचे पदनामात बदल करुन कर सहाय्यक असे करण्यात आले असून त्यांचे ग्रेड पे मध्ये देखिल बदल करण्यात आले आहे .
याशिवाय लेखा व कोषागारे संचालनालय मधील लिपिकांच्या नावांचे एकत्रिकरण करुन कनिष्ठ लिपिक / वरिष्ठ लिपिक / लिपिक – टंकलेखक / टिपणी सहाय्यक / रोखपाल यांचे एकत्रित नाव करुन लेखा लिपिक / कनिष्ठ लेखापाल असे करण्यात आले असून , त्यांचे ग्रेड पे 1900/- रुपये वरुन 2400/- तर आता ते 2800/- रुपये इतके करण्यात आले आहे .
तसेच मंत्रालयातील लिपिक – टंकलेखक पदाचे पदनामात बदल करुन मंत्रालयीन सहाय्यक असे बदल करुन ग्रेड पे 1900/- वरुन 2400/- रुपये करुन घेण्यात आले आहेत . याशिवाय महसुल विभाग मध्ये कार्यरत लिपिक – टंकलेखक या लिपिक वर्गीय पदाचे पदनाम महसुल सहाय्यक असा बदल करण्याच्या मागणीला मान्यता देखिल देण्यात आलेली आहे .
याशिवाय राज्यातील काही श्रीमंत पालिकेतील लिपिक – टंकलेखक पदांचे ग्रेड पे 2400/- तसेच 2800/- इतका आहे . यामुळे इतर पदांवर मोठा अन्यायच होताना दिसून येत आहे .
या संदर्भात संकलित करण्यात आलेली सविस्तर माहिती ( PDF ) पाहण्यासाठी Click Here