Khushi Pawar प्रतिनिधी [ The state government has issued an important warning to pensioners in the state. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी राज्य शासनांकडून सावधगीरीचा आवाहन करण्यात आले आहेत . कारण सध्याच्या डिजिटल युगांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरुपातील फसवणूक होत आहेत .
लेखा कार्यालय , मुंबई तसेच सर्व कोषागार कार्यालय मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालय मार्फत फोनद्वारे / भ्रमणध्वनीद्वारे निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना पेन्शन बंद करणे , सुरु करणे तसेच पेन्शन ( निवृत्तीवेतन ) फरक अदा करणे ..
तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसुल करणे , वाढीव पेन्शन लागु करणे या संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे कळविले जात नाही , अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शन धारकांच्या घरी पाठविण्यात येत नाही . याची गांभिर्याने नोंद घेण्याचे पेन्शन धारकांना आवाहन करण्यात आले आहेत .
जर कोषागार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शन धारकांना द्यायची असल्यास , रितसर संबंधित निवृत्तीवेतन धारकास पत्रव्यवहार करण्यात येत असतो . यामुळे कोणत्याही फसव्या कॉल्सला अथवा फसव्या व्यक्तीपासुन सावध रहावे .
हे पण वाचा : रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त .
त्याचबरोबर सध्या सोशल मिडियावर ऑनलाईन स्वरुपात गुगल पे / फोन पे द्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला बळी पडू नयेत असे आवाहन करण्यात आले आहेत . तसेच सध्या सोशल मिडीयावर निवृत्तीवेतन बंद होवू नये याकरीता लिंक दिली जात आहे , अशा प्रकारची कोणते लिंक भरु नयेत असे आवाहन करण्यात आले आहेत .
अशा प्रकारचे फसवे कॉल्स तसेच संदेश किंवा आपल्या घरी कोणी व्यक्ती कोषागारातुन आला आहे असा दावा करीत असल्यास , तात्काळ आपल्या संबंधित कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..