Khushi Pawar प्रतिनिधी [ Very important revised information booklet (PDF) for government employees of Maharashtra State; General Administration Department. ] : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 31 जुलै 2008 पर्यंत सुधारित करण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 ची सविस्तर माहिती पुस्तिका खालील प्रमाणे पाहु शकता ..
सदरच्या माहिती पुस्तिका नुसार महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांचा संदर्भातील संक्षिप्त नाव व प्रारंभ नमुद करण्यात आल आहे . तसेच अन्वयार्थ व प्रयुक्ती नमुद करण्यात आलेली आहे .
शिक्षेचे प्रकार : भाग 3 मध्ये शिक्षा व शिस्त भंग विषयक प्राधिकरणे नमुद करण्यात आलेली आहे . सरकारी कर्मचाऱ्यांचे केलेल्या शिस्तभंगाच्या स्वरुपानुसार शिक्षा नमुद करण्यात आली आहे . यांमध्ये किरकोळ व जबर शिक्षा नमुद करण्यात आलेली आहे .
यांमध्ये किरकोळ स्वरुपाच्या शिक्षेमध्ये पदोन्नती रोखून ठेवणे , ठपका ठेवणे , सदर कर्मचाऱ्याच्या शिस्तभंगामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानी भरपाई त्याच्या वेतनातुन करणे . तसेच त्याच्या वेतनवाढी रोखून ठेवणे . तर जबर शिक्षा मध्ये सक्तीची सेवानिवृत्ती , सेवेतुन काढून टाकणे , सेवेतुन बडतर्फ करणे .
आदेश , नोटीसा इ.बजावणी : सदर नियमानुसार , नोटीस व इतर आदेशिका या संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला व्यक्तिश : दिले जाईल अथवा त्यांच्याकडे नोंदणीकृत्त पोस्टाने पाठविण्याचे निर्देश आहेत .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी (new pay scale) .
एकत्रित कार्यवाही : 02 अथवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी संबंधित असणारे प्रकरणावर एकत्रित स्वरुपात कार्यवाही केली जाते . सदर कर्मचाऱ्यांचे प्राधिकरणे वेगवेगळी असल्यास , अशा प्रकरणी त्यांच्या पैकी सर्वोच्च असणारी प्राधिकरण या संदर्भात कार्यवाही करेल असा आदेश दिला आहे .
या बाबींवर कोणतेही अपील करता येत नाही : राज्यपाल यांनी काढलेले आदेश , निलंबन आदेश व्यतिरिक्त इतर शिस्त भंग विषयक वादकालीन निकालात काढण्यात आलेले आदेश .
तसेच या माहिती पुस्तिका मध्ये विवक्षित प्रकरणे , उसन्या दिलेल्या सेवा / तरतुदी ,अपिलीय पद्धती , पूनरीक्षण , काल मर्यादा शिथिल व उशीर माफ करण्याचा अधिकार , निरसन व व्यावृत्ती , शंका निरसन इ. बाब नमुद करण्यात आलेली आहे .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..