7th Pay : वेतन त्रुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी कधी ?

Spread the love

@khudhi pawar प्रतिनिधी : सातवा वेतन (7th Pay) आयोगानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समिती गठीत करण्यात आलेली होती . सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे . सदर अहवालानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी कधी लागू होईल ? याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे , या संदर्भातील संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे जाणून घुवूयात .

वेतन त्रुटी : सातवा वेतन आयोगामध्ये (7th Pay commission) बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेले आहेत , सदर वेतन त्रुटी असणाऱ्या पदावरील अधिकारी / कर्मचारी न्यायालयामध्ये जात असल्याने , न्यायालयाने राज्य सरकारला राज्य वेतन त्रुटी निवारण समिती घटित करून राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटीवर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले होते .

त्या अनुषंगाने वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay commission) सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने गठीत समितीने मागील एक वर्षांमध्ये वेतन त्रुटींचा अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे .

सदर अहवालामध्ये सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay commission) ज्या पदांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेले आहेत . अशा पदांना सुधारित वेतन लागू करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आलेली आहे . सदर सुधारित शिफारशींना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर , सदर पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल .

सदर अहवाल राज्य सरकारला सादर होऊन चार ते पाच महिन्याचा अवधी होवून देखील , नेमके सदर अहवालास कधी मंजुरी मिळेल व केव्हापासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाईल ? याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे .

दिनांक 01 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग  (8th Pay commission ) लागू होत असल्याने , राज्य सरकारकडून सातवा वेतन (7th Pay) आयोगातील वेतन त्रुटी लवकरच दूर केल्या जातील .

Leave a Comment