Khushi Pawar प्रतिनिधी : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीकरीता शाळांच्या मुलभुत बाबींमध्ये मोठा बदल करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार तालुका , जिल्हा व राज्य स्तरीय समितीचे गठण करण्यात आलेले आहेत , सदर समितीमार्फत उत्तम दर्जाचे काम करणारे शिक्षक / शैक्षणिक संस्था व शाळांची बँक तयार करणे या कामी कार्य करणार आहेत . आवश्यक भासल्यास , सदर समित्यांवर नियंत्रण ठेवणारी समितीचे गठण करण्यात येणार आहेत .
आयडॉल शिक्षक / शाळांची निवड करतानाचे निकष : यासाठी सर्व प्रथम युडायस , सरल , मित्रा , दिक्षा ॲप , शाळा भेटी / निरीक्षण या बाबींचा विचार केला जाणार आहे . तसेच निश्चित अध्ययन पातळी गाठण्याकरीता नविन पद्धतींचा स्विकार करणे , तसेच सरकारी ध्येय धोरण यांचे प्रभावी अंमलबजावणी करणे , शाळांची मुख्यमंत्री माझाी शाळा सुंदर शाळा मधील भुमिका तसेच अध्ययन निष्पती स्तर ,
आनंददायी शिक्षणाचा प्रयोग , गाव / वस्ती / वॉर्ड / वाडी मधील विद्यार्थ्यांच्या दैनिक उपस्थिती वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न , शिक्षकांची विचार / आचार पद्धती या बाबींचा विचार केला जाणार आहे .
शिक्षकांचे मुल्यमापन 100 गुणांच्या आधारे : अध्ययन निष्पतीच्या कामासाठी 60 गुणांच्या आधारे शिक्षकांचे मुल्यमापन करण्यात येईल . तसेच शिक्षक यांचे मानसिक तसेच शारीरिक आयोग्य करीता 05 गुण दिले जाईल . त्याचबरोबर शिक्षकांचा इतर विविध स्पर्धा / घटना मधील यशस्वी सहभाग करीता 05 गुण दिले जाईल . इतर सर्व कामकाज व गुणांचे भारांकन पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
कामकाम | गुणांचे भारांकन |
अध्ययन निष्पती कामकाज | 60 |
मानसिक / शारीरीक आरोग्य | 05 |
विविध स्पर्धा / घटना मधील सहभाग | 05 |
आवांतर पुस्तकांचे वाचन करीता प्रयत्न | 05 |
शिक्षकांची उपस्थिती | 05 |
परसबाग , वृक्ष संवर्धन , शालेय परिसर यामधील सहभाग | 05 |
अध्ययन निष्पती बाबत पालकामधील जनजागृती | 05 |
मागील 05 वर्षामधील विविध प्रशिक्षा , अभ्यासक्रम | 05 |
राज्य / राष्ट्रीय पातळीवरील योजना / कार्यक्रम यांमधील सहभाग करीता विद्यार्थ्यांना केलेले प्रयत्न | 05 |
या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरीता Click Here